रेवदंडा : प्रतिनिधी
मॅजिक बस फाउंडेशन आणि जेएसडब्ल्यू कंपनी (साळाव) यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच चौल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल गायकर यांनी केले. एन. व्हि. पी. इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राची जोंबराज यांनी महिलांचे शिक्षण व महत्व या विषयावर, शिक्षिका स्वरूपा जाधव यांनी महिला सक्षमीकरण यावर तर आशा सेविका अनुजा ठाकूर यांनी महिलांचे आरोग्य या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी समिक्षा समिर घरत या महिलेचा प्रातिनिधिक स्वरूपात विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी महिला व मुलांसाठी चित्रकला, गायन, खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यात चौल, बागमला, सागमला, पालव, वरंडे, आग्राव, भोवाले, सराई परिसरातील 80 हुन अधिक महिला व मुलांनी भाग घेतला होता. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिन्मयी किल्लेकर हिने केले. जेएसडब्ल्यूचे राम मोहिते, राकेश चवरकर यांच्यासह महिला या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आर्या पराड हिने आभार मानले.