Breaking News

मलिकांचा कोठडीतील मुक्काम वाढला

मुंबई : प्रतिनिधी
दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे तसेच यापूर्वी न्यायालयाने मलिकांचा जामीन अर्जदेखील फेटाळला होता. आता परत कोठडीत वाढ झाल्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
गेल्या 23 फेब्रुवारीला ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहचले. त्यांना सकाळीच ईडी कार्यालयात दाखल करण्यात आले. आठ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना अटक करण्यात आली. त्याच दिवशी त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरच्या हस्तकाकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप ईडीने केला आहे. याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. न्यायालयाने यापूर्वी मलिकांच्या कोठडीत तीनदा वाढ केली असून आतादेखील त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने यापूर्वी मलिकांना 21 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपणार होती. पण, न्यायालयाने परत एकदा मलिकांची रवानगी कोठडीत केली आहे. यावेळी मलिकांना तुरुंगात बेड, गादी आणि खुर्ची पुरविण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply