पनवेल : रामप्रहर वृत्त
छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाहीचा पाया रोवला म्हणूनच आज आपण स्वराज्याची फळे चाखत आहोत त्या प्रखर स्वराज्य निष्ठेची जाणीव ठेवून लोकशाही मूल्यांची जपणूक करा, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले.
उलवे नोडे येथील सेक्टर 16 मध्ये शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्याच्या अध्यक्षपदावरून बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी असंख्य कणखर मावळ्यांच्या साथीने रयतेचे लोककल्याणकारी राज्य निर्माण करून सर्वांना समान हक्क व अधिकार दिले. महाराजांचे लेखी कुणीही नीच किंवा उच्च नव्हता सर्व समान होते, असे प्रतिपादन केले. दरम्यान, सोहळ्यानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्व वृक्षांचे संवर्धन व जोपासना करण्याचे आवाहन या वेळी त्यांनी केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, महाराजांनी चांगले काम करणार्यांचे कौतुक केले. त्याचप्रमाणे चुकीचे काम करणार्यांची कधीच गय न करता लोकशाही मूल्ये स्वराज्यात रूजवली असे सांगून स्वराज्याच्या कारभाराचा रामशेठ ठाकूर यांनी गुणगौरव केला.
उलवे नोड येथे शिवजयंती सोहळ्यानिमित्त आयोजित सोहळ्याचे प्रास्ताविक मंडळाचे उपाध्यक्ष अनिल गमरे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सागरकुमार रंधवे यांनी केले.शिवजयंती सोहळ्यानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सर्व वृक्षांचे संवर्धन व जोपासना करण्याचे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या वेळी केले.
या सोहळ्यास गव्हाण ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ नेते अनंता ठाकूर, सुधीर ठाकूर, भाऊ भोईर, अजय भगत, गव्हाण ग्रामपंचायतच्या सदस्य योगिता भगत, सुजाता पाटील, किशोर पाटील, न्हावा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश कडू, भाजप महिला मोर्चा उलवा नोड उपाध्यक्ष सुजाता पाटील, शिवगर्जना सामाजिक मित्र मंडळाचे अध्यक्ष नवनाथ जाधव, उपाध्यक्ष अनिल गमरे, सचिव सचिन खरात, खजिनदार जगजीवन राठोड, प्रकाश बनकर, सुहास भगत, कमलाकर देशमुख, त्याचप्रमाणे शिवप्रेमी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …