Breaking News

मास्क न लावता फिरणार्‍यांवर पनवेल पोलिसांकडून गुन्हा

पनवेल : वार्ताहर

सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी सर्वांना मास्क लावून फिरणे आवश्यक आहे. असे असूनही पनवेलमध्ये काही नागरिक विना मास्कचे फिरताना  आढळून आल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शत्रुघ्न माळी व विजय तायडे यांचे पथक गस्त घालत त्यांना एक व्यक्ती विना मास्कचा फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेेऊन त्याच्यावर भा. दं. वि. कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात आली. अशाच प्रकारे तक्का परिसरात बिनधास्तपणे उघड्यावर क्रिकेट खेळणार्‍या काही व्यक्तींविरुद्धही कारवाई केली आहे. आतापर्यंत पनवेल शहर पोलिसांनी जवळपास 190 गुन्हे दाखल केले असून त्यांना पनवेल जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यापुढे ही कारवाई अधिक कठोर होणार असून नागरिकांनी घरातच थांबावे तसेच खरंच जीवनावश्यक वस्तूंची गरज असेल अथवा वैद्यकीय मदत हवी असल्यास घराबाहेर पडावे; अन्यथा कोणीही विनामास्क वा सायंकाळी 5 नंतर रस्त्यावर फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पनवेल पोलिसांनी दिला आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply