पद्मश्री मधू मंगेश कर्णिक, सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे, अरुण म्हात्रे यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा नवीन पनवेल आणि उत्तर-दक्षिण रायगडच्या संयुक्त विद्यमाने कवितेची कार्यशाळा आणि खुले कविसंमेलन रविवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या पनवेल मार्केट यार्ड येथील सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या संमेलनाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार असून, सुप्रसिद्ध कवी रामदास फुटाणे आणि अरुण म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्याचप्रमाणे ‘कोमसाप’चे अध्यक्ष प्रा. अशोक ठाकूर, कार्याध्यक्ष नमिता किर, जनसंपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा. एल. बी. पाटील, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष सुधाकर चव्हाण, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष संजय गुंजाळ, जिल्हा प्रतिनिधी गणेश कोळी, सुखद राणे आदी उपस्थित राहणार आहेत.
या कवितांच्या कार्यशाळा आणि खुल्या कवि संमेलनास कवींनी उपस्थित रहावेे, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अॅड. मनोज म्हात्रे, अॅड. प्रा. चंद्रकांत मढवी यांनी केले आहे. दुपारच्या सत्रात होणार्या खुल्या कविसंमेलनात प्रथम, द्वितीय, तृतीय, तसेच उत्तेजनार्थ कवितांना पारितोषिके दिली जाणार आहेत, असेही कळविण्यात आले आहे.