पनवेल : रामप्रहर वृत्त
गव्हाण ग्रामपंचायतीला कोणतीही पूर्वकल्पना न देता मंगळवारी (दि. 22) शिवाजीनगर येथील पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या सिडकोच्या अधिकार्यांना संतप्त ग्रामस्थांनी हाकलून लावले. पूर्वीपासून असणारे पाण्याचे कनेक्शन तोडण्यास या वेळी ग्रामस्थांनी प्रखर विरोध दर्शविला.
गव्हाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या शिवाजीनगर येथील पिण्याचे पाण्याचे कनेक्शन कोणतीही पूर्वसूचना न देता तोडण्यासाठी सिडकोचे अधिकारी पोलिसांसमवेत मंगळवारी आले होते. या वेळी गव्हाणचे उपसरपंच विजय घरत, शिवाजी नगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, जी. के. ठाकूर, विजय ठाकूर, पी. के. ठाकूर, विनोद कडू, महेश ठाकूर, हरजीवन ठाकूर, प्रमोद ठाकूर, सुनील पाटील, पंढरीनाथ ठाकूर, एकनाथ ठाकूर, महिला नंदा ठाकूर, अहिल्याबाई ठाकूर, मालती ठाकूर, आशा म्हात्रे, कुसुम ठाकूर, शांताबाई ठाकूर, रजनी ठाकूर, वंदना ठाकूर तसेच मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व महिला जमल्या आणि त्यांनी सिडको प्रशासनाला हाकलून लावले. पूर्वीपासून असणारे पाण्याचे कनेक्शन तोडण्यास आमचा विरोध असल्याचे या वेळी ग्रामस्थांनी ठणकावून सांगत सिडकोला कारवाईपासून रोखले.
Check Also
पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …