पनवेल : रामप्रहर वृत्त
महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या वर्धापन दिनानिमित्त पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व सिद्धार्थ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. 21) धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती. पूज्य भदंत के. आर. लामा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या धम्म परिषदेचे उद्घाटन भदंत करुणानंद थेरो यांच्या हस्ते झाले.
महान कारूणिक तथागत सम्यक संबुद्धांनी जो सुख, शांती व दुःखमुक्तीचा मानवतावादी धम्म संपूर्ण विश्वाला दिला त्या अतुलनीय धम्माचे सर्वांना ज्ञान व्हावे या भावनेने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या धम्म परिषदेत देशभरातील पूज्य भिक्षू-भिक्षुणी, श्रामणेर-श्रामणेरी व बौद्ध धम्माच्या अभ्यासकांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली.
या परिषदेला महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक संतोष शेट्टी, प्रकाश बिनेदार, नगरसेविका चारूशीला घरत, दर्शना भोईर, सुशिला घरत, राजश्री वावेकर, आरती नवघरे, जि. प. सदस्य अमित जाधव, पूज्य भदंत धम्मानंद थेरो, अतुलरत्न, पूज्य भदंत धम्मबोधी थेरो, करुनानंद थेरो, शांतीरत्न थेरो आदी उपस्थित होते.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …