Breaking News

दिग्गज उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद

अलिबाग : प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 21) रायगड जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सहा विद्यमान आमदारांसह अनेक दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे पाहण्यासाठी आता 24 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 

रायगड जिल्ह्यात पनवेल, कर्जत, उरण, अलिबाग, पेण, श्रीवर्धन व महाड असे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यात प्रशांत ठाकूर, सुरेश लाड, धैर्यशील पाटील, भरत गोगावले, पंडित पाटील, मनोहर भाईर हे विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदिती तटकरे, म्हाडाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर, माजी मंत्री रविशेठ पाटील, काँगे्रसचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिक जगताप, महिला काँगे्रसच्या जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, अपक्ष उमेदवार महेश बालदी, राजेंद्र ठाकूर हे प्रमुख उमेदवार आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत.

गेली दोन दिवस जिल्ह्यात पाऊस पडत होता. सोमवारीही मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला होता. पाऊस पडल्यास मतदानाचा टक्का घसरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती, परंतु वरुणराजाने विश्रांती घेत दिलासा दिला.

-रुग्ण मतदारांसाठी रुग्णवाहिकेची सुविधा

अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी  दाखल असलेल्या 

रुग्णांना मतदान करता यावे म्हणून जिल्हाधिकारीतथा जिल्हा निवडणूक  अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती. अनेक रुग्ण व नातेवाइकांनी या सुविधेचा लाभ घेऊन मतदानाचा हक्क बजावला.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply