Breaking News

व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यास आलेली टोळी गजाआड

पेण पोलिसांकडून पाच आरोपींना अटक

पेण : प्रतिनिधी
व्हेल माशाच्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या उलटीची विक्री करण्यासाठी पेणमध्ये आलेल्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणी पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत.
व्हेल माशाच्या उलटीची विक्री पेण येथे होणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शहरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. रविवारी रात्री 10च्या सुमारास उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर एमएच 47 एवाय 8879 या इनोव्हा क्रिस्टा गाडीतून काही व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याने पोलिसांनी त्यांची तपासणी केली. त्या गाडीत व्हेल माशाची अंदाजे दोन किलो उलटी सापडली असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे दोन कोटी रुपये किंमत आहे.
या प्रकरणी आरोपी विजय परदेशी, प्रेमविर सिंग (रा. उत्तर प्रदेश), सदानंद मोरे (रा. रत्नागिरी), अमोल राघो (रा. नागपूर) आणि अजय आबांवडे (रा. सांगली) अशा पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून व्हेल माशाची उलटी ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपींवर वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972अन्वये कलम 39, 44, 49 (ब), 57, 51 सह भा.द.वि. कलम 34नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे …

Leave a Reply