Breaking News

सुधागड पालीत प्लास्टिकचा पुनर्वापर

पाली : प्रतिनिधी

पालीतील कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये प्लास्टिकचा अविघटनशील कचरा पुनर्वापर करण्यासाठी पाठविला जात आहे. शिवाय येथील बहुतांश वस्तू या पर्यावरणपूरक असून विघटनशील आहेत. येथील कचर्‍याचा वापर खत बनविण्यासाठी केला जातो. या सर्व उपक्रमामुळे हे कॅफे सुधागड तालुक्यातील एकमेव झिरो वेस्ट कॅफे ठरले आहे.

कॅफे बिग ब्ल्यू मारबलमध्ये कोल्ड कॉफी किंवा अन्य गोष्टींसाठी लागणार्‍या दुधाच्या पिशव्या साठवून त्या धुवून स्वच्छ केल्या जातात. त्यानंतर या हजारो पिशव्या पुनर्वापरासाठी मुंबईत पाठवल्या जातात.

येथील कर्मचारीसुद्धा या कामात उत्स्फुर्त सहभाग घेत आहेत.

यामध्ये कॅफेच्या संचालिका सुरभी मोरे यांच्यासह कर्मचारी दर्शना शिंदे आणि हर्षदा गोळे या दोघीदेखील प्लास्टिक टाळण्यासाठी मोठा हातभार लावत आहेत. कोणी प्लास्टिक आणून दिल्यास ते पुनर्वापरासाठी निशु:ल्क पाठविले जाईल, असे सुरभी मोरे यांनी सांगितले.

प्लास्टिक आणि त्याच्या उत्पादनांनी आपले जीवन सुकर केले होते. मात्र प्लास्टिक आता शाप ठरू लागले आहे. त्यामुळे रोजच्या वापरातील प्लास्टिकचा पुनर्वापर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

-सुरभी मोरे, संचालिका, कॅफे बिग ब्ल्यू मारबल, पाली ता. सुधागड

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply