उलवे नोड ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलची (आरटीपीएस) द्वितीय वार्षिक क्रीडा स्पर्धा बुधवारी (दि. 11) अत्यंत उत्साह, शिस्त आणि विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागात यशस्वीरित्या पार पडली. या वेळी संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्पर्धेस भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
क्रीडा स्पर्धेची सुरुवात नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी यांच्या हस्ते मैदान पूजनाने झाली. त्यानंतर गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय घरत यांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे रोहण करण्यात आले, तर आरटीपीएसचे चेअरमन भार्गव ठाकूर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन व मशाल धाव या समारंभाने एकता, परंपरा आणि क्रीडाभावनेचे प्रतीक साकारले.
स्पर्धेस संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी. गडदे, आरटीपीएस खारघरच्या प्राचार्य राज अलोनी, कार्यकारी मंडळ सदस्य प्रकाश भगत, हरिभाऊ पाटील, अॅड. राहुल घरत, वसंत पाटील, एलआरटीपीएस कामोठेचे प्राचार्य अविनाश कुलकर्णी, एमएनएम अॅण्ड टीएनजी कनिष्ठ महाविद्यालय गव्हाण-कोपरच्या प्राचार्य, सायली वाडवलकर, आरटीपीएस खारघरच्या को-ऑर्डिनेटर चश्मिंदर बक्षी, जयवंत देशमुख, कमलाकर देशमुख, रघुनाथ देशमुख, विश्वनाथ कोळी, किशोर पाटील, मिनाक्षी पाटील, किशोर कोळी, श्रीकांत घरत, साईचरण म्हात्रे, दिपाली म्हात्रे, आरटीपीएस उलवेचे प्राचार्य किरणकुमार सुथार आदी उपस्थित होते.
गंगा, यमुना, नर्मदा आणि गोदावरी या चार हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध मार्च पास्टमधून समन्वय, नेतृत्व आणि हाऊसचा अभिमान प्रकर्षाने दिसून आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथ घेऊन प्रामाणिकपणा, न्याय आणि समर्पणाची प्रतिज्ञा केली.
या क्रीडा स्पर्धेत विविध वयोगटांसाठी धावण्याच्या शर्यती तसेच पालकांची रस्सीखेच स्पर्धा रंगली. उपक्रमाचा समारोप पारितोषिक वितरण समारंभाने झाला, ज्यामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या वर्षीची सर्वोत्कृष्ट हाऊस ट्रॉफी गंगा हाऊसने पटकावली. त्यांचे कौतुक झाले.
Check Also
Midi Bbb Company Profile Bbb
Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …
RamPrahar – The Panvel Daily Paper