Breaking News

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पनवेल येथील साईबाबा मंदिरात शिर्डीतील साईबाबांच्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी येणार आहेत. या पार्श्वभूमीवर तीन दिवसीय धार्मिक सोहळ्याच्या नियोजनासाठी पनवेल शहरातील श्री साईबाबा मंदिर व श्री साई नारायणबाबा आश्रमात नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ही बैठक आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीला पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, साई मंदिराचे ट्रस्टी रामलाल चौधरी, राम थदाणी, भाजप पनवेल शहर मंडळ अध्यक्ष व नगरसेवक सुमित झुंजारराव, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेवक राजू सोनी, नगरसेवक दशरथ म्हात्रे, माजी नगरसेवक तेजस कांडपिळे, कळंबोलीचे माजी शहराध्यक्ष रविनाथ पाटील, विनोद पाटील, कामगार नेते रवींद्र नाईक, पत्रकार गणेश कोळी, संजय कदम, मल्हार नेटवर्क प्रा.लि.चे संचालक स्वप्नील ठाकूर, भाजप शहर उपाध्यक्ष रूपेश नागवेकर, भालचंद्र जुमलेदार, डॉ. शकुं बातीजा यांच्यासह मोठ्या संख्येने साईभक्त उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पादुका दर्शन सोहळ्याच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा आणि तीन दिवस चालणार्‍या या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. बैठकीत दर्शन व्यवस्था, भाविकांची सुरक्षितता, वाहतूक नियोजन तसेच विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

Check Also

आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून १८ शाळांना डिजिटल साहित्याचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक शाळेची गरज ओळखून त्या ठिकाणी विकास निधीतून आवश्यक …

Leave a Reply