Breaking News

कर्जत येथे नगरसेवक चषक कॅरम स्पर्धा

कर्जत : बातमीदार

रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने कर्जत शहरात नगरसेवक चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन गटांत ही स्पर्धा दोन दिवस चालणाऱ असून रायगड जिल्ह्यातील आघाडीचे 100 हून अधिक कॅरमपटू सहभागी झाले आहेत.

कर्जत शहरातील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक बळवंत घुमरे यांनी नगरसेवक चषक कॅरम स्पर्धेचे आयोजन कर्जत शहरातील सीबीसी रेसिडेन्सी सभागृहात केले आहे. जिल्हा कॅरम असोसिएशन यांच्या मान्यतेने कर्जत शहरातील वैभव राज कॅरम क्लब आणि ओमसाई कॅरम क्लब यांच्या संयोजनाखाली मुले आणि मुली यांच्यासाठी ही कॅरम स्पर्धा 4 आणि 5 मे रोजी खेळविली जाणार आहे.जिल्ह्यातील 100 हून अधिक आघाडीचे कॅरमपटू या स्पर्धेत

सहभागी झाले असून स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply