पनवेल : प्रतिनिधी
पनवेलमध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेट अकादमी सुरू करण्यास स्थायी समितीने सोमवारी (दि. 25) झालेल्या सभेत मंजुरी देऊन युवा क्रिकेट खेळाडू तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अकादमीत पनवेलमधील युवकांसाठी मोफत जागा राखीव असणार आहेत.
पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी अध्यक्ष नरेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, संतोष शेट्टी, जगदिश गायकवाड व इतर सदस्य तसेच उपायुक्त कैलास गावडे, कल्पता पिंपळे आदी अधिकारी उपस्थित होते.
पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र (अकादमी) स्थापन करण्यात येणार असून तेथे खेळाडूंना प्रशिक्षण देण्याकरिता प्रशिक्षण संस्थेची नेमणूक करण्याच्या विषयास स्थायी समितीने मंजुरी दिली. हे प्रशिक्षण केंद्र महापालिका तयार करणार असून त्यामध्ये पनवेल मनपा हद्दीतील युवकांना मोफत राखीव जागा असणार आहेत.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …