Breaking News

मंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत

करुणा मुंडे उलगडणार प्रेमकथा; फेसबुक पोस्टमुळे खळबळ

मुंबई ः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण त्यांची जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करीत आपल्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशित करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे बलात्काराच्या आरोपानंतर शांत झालेला वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
करुणा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करीत पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर खासगी आयुष्याबद्दल खुलासा करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच खुलासा करीत तक्रार करणार्‍या रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुणा हिच्याशी परस्पर सहमतीने मी संबंध ठेवले होते आणि तिच्यापासून मला दोन मुले आहेत, अशी कबुली दिली होती. यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, मात्र तक्रार मागे घेतल्यानंतर हा वाद शमला, पण आता करुणा मुंडे यांनी पुस्तक प्रकाशित करणार असल्याचे जाहीर केल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply