उपमहापौर सीताताई पाटील यांच्याकडून पाहणी
पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरात विद्युत डीपीला आग लागल्याची घटना घडली. ही आग अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली. दरम्यान, उपमहापौर सीताताई पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या महावितरणच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली होती. आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आल्याने मोठी दुर्घटना टळली.
या आगीची माहिती उपमहापौर सीताताई पाटील यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या संदर्भात आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत केली. वरील घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पथकसुद्धा घटनास्थळी रवाना झाले होते.
दरम्यान, सर्वत्र तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना आगीच्या घटनांमध्येही वाढ होत चालली आहे.