Tuesday , March 21 2023
Breaking News

शेकापसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा उद्या भाजपमध्ये जाहीर प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शुक्रवारी (5 जुलै) सायंकाळी 4 वाजता भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश होणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल तालुक्यातील बांधनवाडी येथील हॉटेल मोतीमहल येथे हा समारंभ होणार असून, या वेळी रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भाजपत प्रवेश करणार्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री रवीशेठ पाटील, माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमास कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी सरपंच मंगेश वाकडीकर, तालुका उपाध्यक्ष संजय टेंबे, जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष किरण माळी, साई ग्रामपंचायतीचे सरपंच विद्याधर मोकल, दिघाटी सरपंच अमित पाटील, भाजप नेते चंद्रकांत पाटील, गणेश पाटील यांनी केले आहे.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply