Breaking News

खैरवाडीत रस्ते होताहेत चकाचक

भाजपाचे तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यात भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे सुरु आहेत. या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विकास निधीमधून खैरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गारमाल वाडीमध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्याहस्ते शनिवारी भूमिपूजन झाले. दरम्यान खैरवाडीत रस्ते चकाचक होत असल्याबाबत ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

पनवेल तालुक्यातील खैरवाडी ग्रामपंचायतीमधील गारमाल वाडीमध्ये 425 मीटर लांबीच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक आमदार विकास निधीमधून 8 लाख रुपये खर्चून करण्यात येणार आहे. या विकास कामाचे भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, भाजपनेते एकनाथ देशेकर, माजी सरपंच संतोष पाटील, किसन म्हात्रे, मोर्बे उपसरपंच परशुराम नावडेकर, खैरवाडी उपसरपंच हनुमान खैर, बाळाराम ऊसाटकर, मोर्बे माजी सरपंच नारायण भगत, जनार्दन कोळंबेकर, प्रकाश भगत, खाणाव उपसरपंच बाळाराम पाटील, माजी सरपंच नामदेव जमदाडे, पिंटू म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल तालुक्याचा सर्वांगीण विकास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली होत असून गरमाल वाडीमध्ये रस्त्याचे काम होणार आहे. त्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Check Also

नमो चषकात कबड्डीचा थरार!

पुरुष गटात नवकिरण, तर महिला गटात कर्नाळा स्पोर्ट्स विजयी उलवे नोड : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ …

Leave a Reply