पनवेल : रामप्रहर वृत्त
नवीन पनवेल येथे ‘मिनीस्ट्री ऑफ पेट्स‘ हे पाळीव प्राण्यांचे क्लिनीक सुरु झाले आहे. या क्लिनिकचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन झाले.
या वेळी देवेश नावंदर आणि प्रविण नावंदर यांनी सुरु केलेल्या या ’मिनीस्ट्री ऑफ पेट्स‘ ला उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. नवीन पनवेल सेक्टर 3 येथे देवेश नावंदर आणि प्रविण नावंदर यांनी मिनिस्ट्री ऑफ पेट्स हे पाळीव प्राण्यांसाठी स्टोअर, स्पा आणि क्लिनीक सुरु केले आहे. याचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. उद्घाटनावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, समाजामध्ये वेगवेगळ्या जातीची प्राणी पाळणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यांच्यासाठी ‘मिनिस्ट्री ऑफ पेट्स’ सुवर्ण खजिना आहे असे सांगून त्यांच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. या वेळी उरणचे आमदार महेश बालदी, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग ड समितीच्या सभापती अॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ, समीर ठाकूर, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रुचीता लोंढे, संजय जैन, जितेंद्र वाघमारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.