आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
Pravin Gaikar
20th February 2022
पनवेल-उरण, महत्वाच्या बातम्या
376 Views
खासदार संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी उपस्थित राहणार

पनवेल ः वार्ताहर
सकल मराठा समाज रायगड जिल्ह्याची बैठक पेण येथे रविवारी (दि. 20) झाली. मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात छत्रपती खासदार संभाजीराजे 26 फेबु्रवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणात रायगड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव संभाजीराजेंना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानावर उपस्थित
राहणार आहेत.
या संदर्भात झालेल्या बैठकीत सर्व समन्वयकांनी राज्य सरकारवर रोष व्यक्त केला. गेल्या दोन वर्षांपासून संभाजीराजे समाजाच्या प्रमुख 7-8 मागण्यांसंदर्भात आंदोलन करीत आहेत, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त आश्वासन देत आहेत, पण प्रश्न काही सोडवत नाहीत. म्हणून संभाजीराजेंना आमरण उपोषण करावे लागत आहे, ही बाब महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. आता तरी राज्य सरकारने आपल्या मागण्या मान्य करून अंमलबजावणी नाही केली तर या सरकारला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, अशी भूमिका सर्व समन्वयकांनी व्यक्त केली. आणि रायगड जिल्हा पूर्ण ताकदीने छत्रपती संभाजीराजेंसोबत राहिल, असा निर्धारही व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला राज्य समन्वयक विनोद साबळे, मारुती पाटील, संतोष पवार, मंगेश दळवी, हरीश बेकावडे, प्रदीप देशमुख, नरेश सावंत, प्रवीण बैकर, अमित यादव आदी उपस्थित होते.