Breaking News

वडखळजवळ तिहेरी अपघात, दोन दुचाकीस्वार ठार

पेण : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर वडखळ गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. 5) सकाळी तीन वाहनांत अपघात होऊन  दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला.

अभय अर्जुन पाटील (वय 36, रा. हाशिवरे, अलिबाग) याने दिलेल्या फिर्यादीनुसार टेम्पो (एमएच- 46,बीबी-6939) वरील चालकाने (नाव माहित नाही) त्याचा बंद पडलेला आयशर टेम्पो मुबई-गोवा महामार्गावर वाहतुकीस अडथळा होईल, या पद्धतीने उभा करून ठेवला होता. आरोपी डंपर चालक मनिष रामबच्चन चौहान (रा. पेण) याने आपल्या ताब्यातील डंपर (एमएच-06,बी डब्ल्यु-4065) हा भरधाव घेऊन जात असताना त्याला आयशर टेम्पो बंद असल्याचे एकदम जवळ आल्यावर लक्षात आल्याने त्याने अचानक ब्रेक दाबला. डंपर मागून येणारी स्कुटी (एमएच-06,सीएफ -4304)  चालक सनोबर फातिमा झहीर काझमी (वय 28, रा. रामवाडी, पेण) व  मोटारसायकल (एमएच-06,सीए-4642) चालक विनोद अरविंद सिह (रा. कोपडा, उत्तरप्रदेश ) या दोघांनी आपल्या गाड्या थांबविल्या असता त्यांच्या पाठीमागून येणारी मिनीबस (एमएच-48,के-9084) चे चालक उमेश विठोबा गमरे (रा. कांदिवली, मुंबई) याचे नियंत्रण सुटल्याने मिनीबसने दोन्ही दुचाकीनां जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीस्वार सनोबर काझमी व विनोद सिंह डंपर व मिनीबस यांच्यामध्ये दबले गेले. त्यात ते गंभीर जखमी होऊन मरण पावले.

या प्रकरणी आयशर टेम्पो चालक (नाव माहीत नाही), डंपर चालक मनिष चौहान, मिनीबस चालक उमेश गमरे यांच्या विरोधात वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास  उपनिरीक्षक अतुल मडके करीत आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply