Breaking News

पांगळोली येथे गोठ्याला आग, चार जनावरे होरपळली, एकाचा मृत्यू

पोलादपूर : प्रतिनिधी

तालुक्यातील पांगळोली गावातील भूमिहीन शेतकर्‍याच्या गोठ्याला बुधवारी (दि. 4) दुपारनंतर अचानक आग लागून चार गुरे होरपळली. त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झाला. पोलादपूर तहसीलदार दिप्ती देसाई यांच्या आदेशानुसार तातडीने पंचनामा करण्यात आला आहे.

पोलादपूर तालुक्यातील पांगळोली येथील लोकांची शेतजमिन तोंडी भाड्याने घेऊन कसणारे परशुराम दाजी उपाळे यांच्या कुटूंबियांची केवळ म्हशी, गायी या चार-पाच पाळीव जनावरांवरच उपजीविका अवलंबून होती. बुधवारी दुपारी 4 वाजल्यानंतर या गुरांच्या गोठ्यास अचानक आग लागली. या दुर्घटनेत ही जनावरे होरपळून गंभीर जखमी झाली आहेत. यापैकी एका बैलाचा मृत्यू  झाला आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply