जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे आदेश
अलिबाग : प्रतिनिधी – पावसाळ्यापूर्वी करावयाच्या अत्यावश्यक कामांच्या देखभाल दुरुस्तीची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
मान्सूनपूर्व तयारी अंतर्गत नालेसफाई, रस्ते, पूल दुरुस्ती, रस्त्यांच्या साईडपट्टींचा भराव करणे, शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, विहिरींची दुरुस्ती, विद्युत वितरण अखंडित राहण्यासाठी आवश्यक दुरुस्तीची कामे, खार बांधबंदिस्तीची कामे आदी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या अत्यावश्यक कामांची देखभाल व दुरुस्तीची कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी तातडीने पूर्ण करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी
निधी चौधरी यांनी दिले.ही कामे करताना करोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मजूर कामगारांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. कामगारांनी मास्क परिधान करणे, सॅनिटायझर वापरणे, हॅण्डवॉशने हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे इत्यादी उपाययोजना काटेकोरपणे कराव्यात, कंत्राटदारामार्फत कामगारांसाठी हॅण्डवॉश, साबण, सॅनिटायझर, मास्क इत्यादी सुविधा प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपलब्ध करून द्याव्यात, कामगारांची ने-आण करताना सुरक्षितता बाळगावी व सामाजिक अंतर ठेवावे, कामाच्या ठिकाणी कामगारांची जास्त गर्दी होणार नाही व काम करताना देखील सामाजिक अंतर राहील, याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व संबंधितांना दिल्या आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper