पनवेल ः रामप्रहर वृत्त
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईज आणि राज्य शासनाच्या इसीआरपी अंतर्गत पनवेल येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाला विविध वैद्यकीय मेडिकल साहित्य देण्यात आले असून याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी (दि. 26) झाले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी जोपर्यंत डायलेसीससाठी अधिकृत टेक्निशियन उपलब्ध होत नाही तोपर्यंत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून टेक्निशियन देण्यात येईल, असे जाहीर केले. उपजिल्हा रुग्णालयाला रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने एक सोनोग्राफी मशीन, पाच बेबी वॉर्मर, दोन रेडियंट हिटर, एक पिडीयाट्रीक व्हेंटिलेटर, रोटरी क्लब ऑफ पनवेल सनराईजने पिडीयाट्रीक सर्जरीसाठी लागणारी इन्स्ट्रुमेंट आणि राज्य शासनाच्या इसीआरपी अंतर्गत 32 पिडीयाट्रीक आयसीयु बेड, 40 अडल्ट आयसीयु बेड आणि तीन केएल क्षमतेचा लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन टँक देण्यात आला आहे. या सर्व साहित्याचा उद्घाटन सोहळा मंगळवारी रुग्णालयात झाला. या कार्यक्रमास महापालिकेचे माजी आरोग्य सभापती डॉ. अरुणकुमार भगत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, रोटरी क्लब ऑफ सनराईजचे डॉ. विजय कुलकर्णी, श्री. ठाकरे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन संकपाळ, डॉ. कालेल आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सर्वांनी एकत्र येऊन काम गरजेचे असून या रुग्णालयाला विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करणार आहे तसेच सध्या रुग्नालयात डायलेसीसाठी एक टेक्निशियन आहे व अजून एक टेक्निशियन उपलब्ध झाल्यास काम दुप्पट वेगाने करता येईल. त्यामुळे जोपर्यंत अधिकृत टेक्निशियन उपलब्ध होत नाही तोपर्यंत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने टेक्निशियन उपलब्ध करून देण्यात, असे त्यांनी जाहीर करून जे जे सहकार्य लागेल ते करू, असे आश्वासन दिले.
Check Also
रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण
खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …