नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोलकाता आणि बिहारच्या लिचीचा गोडवा आता नवी मुंबईकरांना चाखायला मिळणार आहे. कारण नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये लिचीची आवक सुरू झाली आहे.
वाशीतील फळबाजारात 5 ते 9 हजार किलो इतकी लिचीची आवक झाली आहे. दहा किलोच्या लिचीच्या एका पेटीला 1500 ते 2 हजारांपर्यंत भाव मिळतोय. त्वचा सुंदर बनवण्यास मदत करणार्या आणि वजन घटवणार्या लिचीची मागणी वाढू लागली आहे. एकुणच येत्या काळात लिचीची आवक वाढल्यास लिचीचा दर कमी होण्याची शक्यता आहे.