Breaking News

पोलीस पाटील संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी संजय पाटील

उरण : प्रतिनिधी

उरण तालुक्यातील चिरनेर येथील पोलीस पाटील संजय गजानन पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पनवेल येथे नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात संजय पाटील यांना भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

संजय पाटील हे सध्या चिरनेर या उरण तालुक्यातील ऐतिहासिक गावाचे पोलीस पाटील म्हणून कार्यरत आहेत. संजय पाटील यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागातील पोलीस पाटील वर्गात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. कोकण प्रांतातील पोलीस पाटीलांचे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करणार असल्याची ग्वाही संजय पाटील यांनी नियुक्ती नंतर बोलताना दिली.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply