Monday , June 5 2023
Breaking News

पी. जे. पाटील म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रशंसोद्गार, अमृत महोत्सवानिमित्त सत्कार

उरण : वार्ताहर

पी. जे. पाटील म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे प्रशंसोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले.

जसखार गावचे  सुपुत्र, प्रकल्पग्रस्तांचे नेते व शिक्षणप्रेमी पी. जे. पाटील यांचा अमृत महोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा मंगळवारी

(दि. 26) श्री रत्नेश्वरी देवी मंदिर मैदान जसखार येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी उपस्थितांसमोर लोकनेते रामशेठ ठाकूर बोलत होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  माजी मंत्री जगन्नाथ पाटील, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मनोहर भोईर, जेएनपीटी विश्वस्त महेश बालदी, दिनेश पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजप महिला मोर्चा अध्यक्षा कल्पना राऊत, उद्योजक पी. पी. खारपाटील, मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, उद्योजक दौलत घरत, वीर वाजेकर कॉलेजचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे, भाजपा उरण तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, कामगार नेते सुधीर घरत, उद्योजक सदानंद गायकवाड, वीर वाजेकर शाळेचे चेअरमन कृष्णा कडू, जसखारचे सरपंच दामूशेठ घरत, माजी सरपंच रमाकांत म्हात्रे आदी उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, विभागाच्या विकासासाठी त्यांनी अनेक कामे केली. तरुणांना नोकर्‍या, शैक्षणिक कामेही केली. त्यांच्यावर अनेक प्रसंग आले तरी ते कधीही डगमगले नाहीत. या परिसराचा विकास व्हावा अशा प्रकारचे त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी दि. बा. पाटील व वाजेकरशेठ यांच्याबरोबर चांगले काम केले आहे. तुम्ही एक सुखी आणि समाधानी माणूस आहात. जो सुखी-समाधानी असतो त्यास यश प्राप्त होते. अशा व्यक्तीच्या मागे यश व पैसा येतो हे लक्षात ठेवावे. पी. जे. पाटील यांच्यासारखे सहकारी बरोबर असतील तर कोणतेही काम अशक्य नाही. येथे श्री रत्नेश्वरी देवीचे देऊळ, सुंदर वास्तू दिसत आहे ती पी. जे. पाटील यांच्या नेतृत्वामुळेच. वीर वाजेकर कॉलेजचे प्राचार्य यांनी पी. जे. पाटील यांच्या जीवनावर पुस्तक लिहावे. त्यामुळे समाजाला त्यांचे कार्य समजेल. त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील काम मोठे आहे. वीर वाजेकर कॉलेजच्या विकासासाठी त्यांचे भरीव कार्य आहे, असेही त्यांनी सांगितले. या वेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, प्राचार्य गोरख सांगळे यांनीही पी. जे. पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. दिनेश पाटील, उरणचे आमदार मनोहरशेठ भोईर, कामगार नेते सुधीर घरत, प्रशांत पी. पाटील, शैलजा घरत, ऐश्वर्या पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमास पी. जे. पाटील यांचे कुटुंबीय प्रशांत पाटील, राजेश पाटील, कांचन पाटील, संगीता पाटील, नातू आर्यन पाटील, कामगार नेते सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, उद्योजक राजेंद्र खारपाटील, काँग्रेस उरण शहर अध्यक्ष किरीट पाटील, चंद्रकांत घरत व उरण तालुक्यातील सर्व मान्यवर ज्येष्ठ नागरिक तसेच पी. जे. पाटीलसाहेबांवर नितांत प्रेम करणार्‍या सर्व हितचिंतकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. प्रशांत पाटील, राजेश पाटील, सुधीर घरत, दामूशेठ घरत आदी कार्यक्रमाचे निमंत्रक होते. सूत्रसंचालन दर्शना माळी यांनी केले.

– प्रकल्पग्रस्तांसाठी कार्यरत राहणार

जेएनपीटीमध्ये तरुणांना नोकर्‍या मिळाव्यात म्हणून त्यावेळेस माझ्यासह या भागातील 500 ते 600 तरुण 10 दिवस जेलमध्ये होतो. आम्ही काय सहन केले, काय भोगले, काय सोसले व काय किंमत मोजली हे जास्त काही सांगत नाही. तेवढा वेळ नाही. आम्ही लढलो म्हणून अनेकांचे कल्याण झाले. आम्ही लढलो म्हणून शेकडो घरातील चुली पेटल्या. आम्ही लढलो म्हणून जेएनपीटीमध्ये 1200  कायमस्वरूपी नोकर्‍या प्रकल्पग्रस्तांना मिळाल्या हे कार्य कुणीही नाकारू शकत नाही. हे आम्ही छातीठोकपणे सांगतो, असे भाजप नेते पी. जे. पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.जसखार परिसरातील गावातील कामे झाली आहेत व पुढे करावयाची आहेत. ती कामे पी. जे. पाटील तुम्ही कराल. आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला कुणीही विसरू शकत नाही. तुम्ही शताब्दी साजरी कराल.
लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार

पी. जे. पाटील हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सोबतीने रयत शिक्षण संस्थेमध्ये रायगड विभागाचे चेअरमन होते. अनेक शाळांसाठी त्यांनी काम केले आहे. तेथील शाळांना पायाभूत सुविधा नव्हत्या, त्या मिळवून  दिल्या. शिक्षणाविषयी शिक्षकांच्या अडचणी सोडविल्या आहेत. तुम्ही राजकारण, कला, शैक्षणिक आदी क्षेत्रांत काम केले आहे. खर्‍या अर्थाने हाडाचा कार्यकर्ता आज पंच्याहत्तरी साजरी करीत आहे. तुम्ही शतायुषी व्हा.
-आमदार प्रशांत ठाकूर, सिडको अध्यक्ष

आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आपण कायम उभे राहिलात. त्यांच्यामुळे तुमचे पुढील शतक महोत्सव साजरे होईल. तुम्हाला  निरोगी दीर्घायुष्य लाभो, अशी रत्नेश्वरी देवीला मी प्रार्थना करतो. तुम्ही यापुढील आयुष्यात तुमच्या कुटुंबाला, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना, गावाला, पक्षाला मार्गदर्शक राहाल.  -महेश बालदी, भाजपा नेते

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply