Breaking News

पनवेलमध्ये भाजपतर्फे मोदी सरकारच्या विविध योजनांची सर्वसामान्यांना माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात मोदी सरकारच्या माध्यमातून विकासाच्या अनेक योजना राबवून नागरिकांना त्याचा लाभ देण्यात आला. त्या अनुषंगाने सरकारच्या या योजनांची माहिती जास्तीत जास्त सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी याकरिता भाजपच्या वतीने सेवा सुशासन आणि गरीब कल्याणपर्व या कार्यक्रम राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत सोमवारी पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे यांना नेतृत्वाखाली तक्का येथील कातकरी वाडी व वैदूवाडी येथे योजनांची माहिती देण्यात आली.
पनवेलमधील तक्का येथे भारतीय जनता पक्षाच्या सेवा सुशासन आणि गरीब कल्याणपर्व कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत कातकरी वाडी व वैदूवाडीत समाजातील वंचित घटक व शहरी भागातील गरीब लोकांची भेट घेण्यात आली.
नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे मिळणार आहेत. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शौचालये, अन्ना सुरक्षा योजनेंतर्गत मोफत अन्नधान्य मिळत आहे. उज्ज्वला योजनेमार्फत मोफत गॅस कनेक्शन तसेच ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यं पोहचली पाहिजे या सेवा सुशासन व गरीब कल्याणपर्व कार्यक्रमामागचा उद्देश आहे.
तक्का येथे झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, युवा नेते प्रतीक बहिरा, पनवेल शहर झोपडपट्टी अध्यक्ष चंद्रकांत मंजुळे, वॉर्ड क्रमांक 20चे अध्यक्ष रघुनाथ बहिरा, शक्ती केंद्र प्रमुख आनंद गुरव, राजू कोळी, गोपीनाथ लोखंडे, संदीप पगडे, अमर पठाण, अशोक आंबेकर, नितीश बहिरा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply