पनवेल : वार्ताहर
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन अलिबाग रायगड यांच्या पनवेल शाखेतर्फे हुतात्मा स्मारक उद्यान रोटरी क्लब पनवेल येथे नुकताच वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. पनवेल शाखा प्रमुख विजय पाटील तसेच राखी पाटील यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामध्ये फुलझाडांचे व फळझाडांची रोपे लावण्यात आली. या वेळी तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक फाऊंडेशन रायगड सचिव राखी पाटील, तालुका प्रमुख विजय पाटील, कार्यकारी सदस्य शैलेश घरत, सुनीता रास्वे, नेहा गिर्हे, सिद्धिका तांबोळी, तसेच हुतात्मा उद्यानाचे केअर टेकर संजय मौर्य आणि अरविंद शर्मा यांची प्रमुख उपस्थिती व सहकार्य लाभले. विशेष बाब म्हणजे युवापिढीने सदर उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला. झाडे लावा, झाडे जगवा ब्रीद हे पाळू, लावून एक रोपटे ग्लोबल वॉर्मिंग टाळू असे संदेश देणारे फलक दर्शवून तेजस्विनी फाऊंडेशनने जनजागृती केली.