Breaking News

आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजप घवघवीत यश मिळवेल : लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
येणार्‍या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विकासकामांच्या जोरावर घवघवीत यश संपादित करेल, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 16) कळंबोली येथे व्यक्त केला. पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध विकासकामांचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत झाला. त्या वेळी ते बोलत होते.
कळंबोली सेक्टर 10मधील आई माता मंदिरात झालेल्या या समारंभाला पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील, नगरसेवक बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, विकास घरत, नगरसेविका मोनिका महानवर, भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, जिल्हा सरचिटणीस अशोक मोटे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमर ठाकूर, जमीर शेख, महिला मोर्चाच्या प्रियंका पवार, प्रिया मुकादम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या वेळी नगरसेविका मोनिका महानवर व अशोक मोटे यांच्या प्रयत्नाने सेक्टर 5 प्लॉट नंबर 19 ’अ’मधील नव्याने उद्यान सुशोभीकरण करणे, प्लॉट नंबर 3मधील मैदान सुशोभीकरण करणे या दोन कोटी 34 लाख रुपयांचे कामाचे, नगरसेवक बबन मुकादम व नगरसेविका राणी कोठारी यांच्या प्रयत्नातून सेक्टर 2 प्लॉट नंबर 11 ‘अ’मध्ये नव्याने उद्यान सुशोभीकरण करणे या एक कोटी 39 लाख रुपयांचा कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे नगरसेवक अमर पाटील यांच्या 14 लाख रुपयांच्या नगरसेवक निधीतून कळंबोली सेक्टर 10मधील ए-1 ते ए-5 सोसायटी, सेक्टर 8 यश कॉम्प्लेक्समध्ये स्टॅम्प काँक्रिटीकरण तसेच चार लाख रुपयांच्या नगरसेवक निधीतून सेक्टर 8 ते 20मधील सोसायट्यांसमोर बेंचेस बसवण्याच्या कामाचे आणि सेक्टर 10मध्ये स्वखर्चातून ज्येष्ठ नागरिकांसाठी साकारण्यात आलेल्या वाचनालयाचा शुभारंभही या सोहळ्यात करण्यात आला.
आपल्या भाषणात लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, आज अनेक कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन होत आहे. हे फक्त कळंबोलीपर्यंत मर्यादित असून संपूर्ण महापालिका क्षेत्रात शेकडो कोटींची कामे सुरू आहेत. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेसाठी आग्रह धरला. त्यास अनेकांनी विरोध केला, मात्र आज होत असलेली विकासाची कामे पाहता महापालिका होणे किती महत्त्वाचे होते हे लक्षात येत आहे. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजीव होऊन काम करीत आहेत. त्यामुळे येणार्‍या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष घवघवीत यश संपादित करेल. त्यांनी पुढे बोलताना सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास या पाच वर्षांत जी विकासाची कामे झाली त्यापेक्षा अधिक विकासाची कामे येत्या पाच वर्षांत होतील, असे प्रतिपादन केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना, अमर पाटील यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये नगरसेवक, सभापती, पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता म्हणून जी जबाबदारी मिळाली ती पूर्ण करण्यासाठी सर्व झोकून काम केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ते पुढे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकास हे सूत्र घेऊन देशभरात काम करीत असून कळंबोलीतील नगरसेवकही नागरिकांना विविध सुविधा देण्याकरिता सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. सबका प्रयास लक्षात घेऊन लोकांपर्यंत भारतीय जनता पक्ष अधिकाधिक पोहचावा तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वांनी सातत्याने कार्यरत राहूया.
महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी सांगितले की, अमर पाटील यांनी विकासकामे करण्याकरिता महापालिका आणि नगरसेवक निधी तसेच गरज पडल्यास स्वतःच्या खर्चाने विकासाची कामे केली आहेत. त्यांचे हे सेवाकार्य असेच सुरू रहावे, असे सांगत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply