पनवेल ः रामप्रहर वृत्त
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामधील महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र पांचाळ यांनी महायोगी गगनगिरी विद्यार्थी वसतिगृहतील विद्यार्थ्यांना वह्या देण्याबाबत सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन देण्यात आले होते. त्याअनुषंगाने तेथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे राजेंद्र पांचाळ यांनी आभार मानले.
सामाजिक क्षेत्रात वडिलांच्या पावलावर पाऊल उचलत अमित रोकडे यांनी सातारा जिल्ह्यातील महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय पांचाळ यांच्या विनंतीला मान देऊन, सिडको अध्यक्ष तथा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय आणि विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना 10 जुलै रोजी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते वह्यावाटप करण्यात आल्या. त्यानिमित्त जावळी तालुक्यामधील महंत आबानंदगिरी चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र पांचाळ यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेऊन
आभार मानले.