Breaking News

मृत विद्यार्थ्याचे घवघवीत यश

नोएडा ः वृत्तसंस्था

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. देशभरातील 91.1 टक्के विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षेत यश मिळवले.

यामध्ये उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील विनायक श्रीधर याला इंग्रजीत 100पैकी 100, विज्ञानामध्ये 96 आणि संस्कृतमध्ये 97 गुण मिळाले आहेत, मात्र हा निकाल पाहण्यासाठी विनायक या जगात नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना ज्या आजाराने ग्रासले होते त्याच आजाराने विनायकचा परीक्षेदरम्यानच मृत्यू झाला. ड्यूकेने स्नायू डिस्ट्रॉफी या आजाराने विनायकला ग्रासले होते.

नोएडामधील अमेठी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणार्‍या विनायक श्रीधरने तीन विषयांत जवळपास 100 गुण मिळवले. प्रसिद्ध दिवंगत भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्याप्रमाणेच ड्यूकेन मस्क्यूलर डिस्ट्रॉफी (डीएमडी) हा दुर्धर आजार त्याला झाला होता. त्यामुळे विनायकने तिन्ही पेपर व्हीलचेअरवर बसूनच दिले. विशेष म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी असणार्‍या कोट्यामधून परीक्षा न देता विनायकने सर्वसामान्य मुलांप्रमाणेच दहावीची परीक्षा दिली होती. इंग्रजी व विज्ञान विषयात त्याने एका शिक्षिकेची मदत घेतली होती, पण संस्कृतचा पेपर त्यांने स्वतः लिहिला होता, मात्र हे तीन पेपर दिल्यानंतर उर्वरित दोन पेपर देण्याआधीच मृत्यूने विनायकला गाठले. विनायकला अंतराळवीर व्हायचे होते, मात्र त्याचे ते स्वप्न अपूर्णच राहिले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply