Breaking News

नवीन पनवेलमध्ये व्हीएन ट्रान्स लाईन व्यवसाय सुरू

कार्यालय व केबिनचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेल सेक्टर 4 येथे व्ही. एन. ट्रास्न लाईन हा नवीन व्यवसाय विक्रांत म्हस्कर आणि नितेश घुगे यांनी सुरू केला आहे. त्यांच्या या नवीन व्यवसायाच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते तर केबिनचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 26) करण्यात आले.

नवीन पनवेल येथे विक्रांत म्हस्कर आणि नितेश घुगे यांनी व्ही. एन. ट्रान्स लाईन हा सिमेंट, ट्रान्सपोर्ट, बिल्डींग मटेरीयल सप्लायचा नवीन व्यवसाय सुरू केला. त्यांच्या या नवीन व्यवसायाच्या कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले असून, त्यांनी पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या वेळी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेलच्या उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय कांडपिळे, भाजप ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, शशिकांत भगत, पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील, भिवंडीचे माजी महापौर तुषार चौधरी, प्रशांत पाटील, नवी मुंबई मनपाचे माजी सभापती अशोक पाटील, नेरेच्या सरपंच राजश्री म्हस्कर, युवा मोर्चाचे अभिषेक भोपी, नवी मुंबई मनपाचे नगरसेवक निशांत भगत, संजय म्हस्कर, जगदीश म्हस्कर, एकनाथ घुगे, प्रकाश घाडगे, वासुदेव गवते, पं. स. सदस्य राज पाटील, जितेश मगर, डॉ. रोशन पाटील, अमोघ प्रशांत ठाकूर, जागृती भगत, जल्पा चौधरी, स्वप्नाली पाटील, समीक्षा घुगे आदी उपस्थित होते. या वेळी शुभांगी म्हस्कर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Check Also

आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक वुईके यांची पनवेलमध्ये कातकरी समाजाच्या प्रश्नावर क्षेत्रभेट आणि बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील प्लॉट क्रमांक ५३८ ए येथील कातकरी समाजाच्या मालकी हक्काच्या …

Leave a Reply