अटीतटीच्या सामन्यात दिल्ली विजयी ; आज चेन्नईशी भिडणार

विशाखापट्टणम : वृत्तसंस्था

अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे. दिल्लीने हैदराबादचा 2 गडी राखून पराभव केला. पंतच्या स्फोटक खेळीच्या जोरावर दिल्लीने एलिमिनेटर सामना जिंकला आहे. दिल्लीकडून ऋषभ पंतने ताबडतोड खेळी केली. त्याने 21 चेंडूत 49 रन कुटल्या. दिल्लीने विकेट गमावल्यानंतर पंतने एकाकी खिंड लढवत दिल्लीला विजय मिळवून दिला. पंतचे दिल्लीच्या विजयात महत्त्वाचे योगदान होते. दिल्लीकडून पृथ्वी शॉने सर्वाधिक 56 धावा केल्या.

दिल्लीचा विजय झाल्याने चेन्नई आणि दिल्ली यांच्यात क्वालिफायर-2 चा सामना खेळला जाईल. हा सामना शुक्रवारी (दि. 10) खेळण्यात येणार आहे.  हैदराबादने दिल्लीला विजयासाठी 163 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान दिल्लीने 1 चेंडू राखून पूर्ण केले. दिल्लीने 19.5 ओव्हरमध्ये 165 धावा केल्या.

विजयी आव्हानाचे पाठलाग करताना दिल्लीची शानदार सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने आपल्या संघाला अपेक्षित अशी सुरुवात मिळवून दिली. या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 66 रनची पार्टनरशीप झाली. ही जोडी तोडायला दीपक हुड्डाला यश आले. त्याने शिखर धवनला रिद्धिमान साहाच्या हाती स्टंपिग केले. धवन 17 धावा करून माघारी परतला.

धवननंतर कॅप्टन श्रेयस अय्यर मैदानात आला. या दरम्यान पृथ्वी शॉने आपले अर्धशतक पूर्ण केले. पृथ्वीचे आयपीएलमधील हे 4 थे अर्धशतक ठरले.पृथ्वी-श्रेयस अय्यरमध्ये पार्टनरशीप होण्याआधीच ही जोडी खलील अहमदने मोडून काढली. श्रेयस अय्यरनंतर ऋषभ पंत मैदानात आला. खलील अहमदने 11 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर पृथ्वीला माघारी पाठवले.

एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट गेल्याने दिल्लीवर दबाव निर्माण झाल्याचे वाटत होते, पंरतु मैदानात असलेल्या ऋषभ पंत-कुलीन मुनरोने संधी मिळाल्यावर मोठे फटके मारत टीमचा स्कोअरबोर्ड धावता ठेवला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 24 धावा केल्या. हैदराबादचा स्कोअर 111 असताना कुलीन मुनरो 14 धावा करून तंबूत परतला. त्याला राशीद खानने एलबीडबल्यू केले. रशीदने त्याच ओव्हरमध्ये अक्षर पटेलला देखील माघारी पाठवले. अक्षर पटेलला भोपळा देखील फोडता आला नाही.

दिल्लीने खलील अहमद आणि राशीद खान यांच्या ओव्हरमध्ये प्रत्येकी 2 विकेट गमावले. दिल्लीचे विकेट जात असताना ऋषभ पंत सावधपणे खेळत होता. दिल्लीला अवघ्या काही धावांची गरज असताना  पंत आऊट झाला. पंत आऊट झाल्याने हैदराबादचे मॅचमध्ये पुनरागमन झाले, परंतु केमो पॉलने मारलेल्या शॉटमुळे दिल्लीचा विजय झाला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि  राशिद खान या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतले. तर दीपक हुड्डाने 1 विकेट मिळवला.

याआधी दिल्लीने टॉस जिंकून हैृदराबादला फलंदाजीसाठी बोलावले. हैदराबादने 20 ओव्हमध्ये 8 विकेट गमावून 162 धावा केल्या. हैदराबादकडून मार्टिन गुप्टीलने तडाखेदार 19 बॉलमध्ये 36 धावांची खेळी केली, तर मनिष पांडे, विजय शंकर, केन विलियमसन मोहम्मद नबीने देखील 20 पेक्षा अधिक रन करत चांगली साथ दिली. दिल्लीकडून किमो पॉलने 3 विकेट घेतल्या. तर इशांत शर्माने 2 आणि ट्रेंट बोल्ट आणि अमित मिश्राने 1-1 विकेट घेतली.

– चेंडू स्टंपला न लागताच अमित झाला बादसामन्याचा थरार शेवटच्या षटकापर्यंत रंगलाच, पण याच षटकात क्रिकेटमधील एक दुर्मिळ गोष्ट पाहायला मिळाली. ती होती, अमित मिश्राचं धावचित होणं. चेंडू स्टम्पला लागला नसतानाही क्रिकेटमधील एका नियमाच्या आधारे त्याला बाद दिलं गेलं. खलील अहमद गोलंदाजी करत होता आणि अमित मिश्रा स्ट्राईकवर होता. खलीलच्या चेंडूवर अमित मिश्रानं बॅट फिरवली, पण फटका चुकला आणि चेंडू यष्टिरक्षक वृद्धिमान साहाच्या हाती गेला. अमित मिश्रा धावल्याचं पाहून साहानं त्याला रन-आउट करायचा प्रयत्न केला, परंतु त्यानं फेकलेला चेंडू स्टम्पला न लागता गोलंदाज खलील अहमदकडे गेला. त्यानं झटक्यात चेंडू उचलून नॉन-स्ट्राईक एन्डवर अमित मिश्राला धावचित करायचा प्रयत्न केला, परंतु खलीलनं फेकलेला चेंडू स्टम्पना लागणं तर सोडाच, पण त्या दिशेनं गेलाच नाही. स्वाभाविकच मैदानावरील पंचांनी बाद देण्याचा प्रश्नच नव्हता, परंतु हैदराबादच्या खेळाडूंनी डीआरएससाठी अपील केलं. हैदराबादचं अपील ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’साठी होतं. आपण धाव पूर्ण करू शकणार नाही, याची कल्पना आल्यानं अमित मिश्रा स्टम्पच्या समोरून धावत होता. खलीलनं फेकलेला चेंडू त्याच्यामुळे अडला होता. त्यामुळे तिसर्‍या पंचांनी पुन्हा संपूर्ण प्रसंग तपासून अमित मिश्राला बाद दिलं.

Check Also

Perish Arten bei Freispielen existieren in Moglich Casinos?

Neue Casinos via Freespins abzuglich Einzahlung Der ihr Hauptvorteile beim Zum besten geben in virtuellen …

Leave a Reply