खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात मंगळवारी (दि. 26) कारगिल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस याच दिवशी कारगिल युध्दात भारताने आपला विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस साजरा करण्याचे महत्त्व स्वप्ना भांडवलकर यांनी मुलांना भाषणाद्वारे सांगितले.
कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रगीताने झाली. सर्व शिक्षकांनी त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी मेणबत्ती पेटवून कारगिल युध्दामध्ये शहिद झालेल्या सैनिकांना अभिवादन केले. या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या निशा नायर यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रम व्यवस्थित व्हावा म्हणून सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहाकार्य लाभले. कार्यक्रमाकरिता संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव श्री. गडदे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.