Breaking News

श्रीलंकेसाठी शेवट गोड; तिसर्‍या वन डे सामन्यात भारतावर मात

कोलंबो ः वृत्तसंस्था

तब्बल सहा बदल केलेल्या टीम इंडियावर श्रीलंकेने तिसर्‍या आणि शेवटच्या वन डेत तीन गड्यांनी मात केली. ही मालिका भारताने यापूर्वीच जिंकली आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना प्रत्येकी 47 षटकांचा करण्यात आला, पण टीम इंडियाला पूर्ण षटकेही खेळता आली नाहीत. घाऊक बदल केलेली टीम इंडिया 43.1 षटकात 225 धावांवर आटोपली. लंकेकडून अकिला धनंजया आणि प्रवीण जयविक्रमा यांनी प्रत्येकी तीन गडी बाद करीत टीम इंडियाच्या डावाला सुरूंग लावला. प्रत्युत्तरात लंकेकडून सलामीवीर अविष्का फर्नांडो, नवखा भानुका राजपक्षा यांनी झुंजार खेळी करीत सामना जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. या दोघांनी अर्धशतकी खेळी करीत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. टीम इंडियाने ही वनडे मालिका 2-1 अशी खिशात टाकली आहे. अविष्काला सामनावीर, तर मुंबईकर सूर्यकुमार यादवला मालिकावीर पुरस्कार मिळाला.

संक्षिप्त धावफलक : भारत : 43.1 षटकांत सर्व बाद 225 (पृथ्वी शॉ 49, संजू सॅमसन 46; अकिला धनंजया 3/44, प्रवीण जयविक्रमा 3/59) पराभूत वि. श्रीलंका : 39 षटकांत 7 बाद 227 (अविष्का फर्नाडो 76, भानुका राजपक्षे 65; राहुल चहर 3/54)

Check Also

न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या …

Leave a Reply