Breaking News

सुधागडात कोरोनाविषयी जनजागृती

प्रभातफेरी व रंजक गाण्यांतून प्रबोधन

पाली ़: प्रतिनिधी

सुधागड तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात कोरोनाने शिरकाव केला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच, शिवाय रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील वाढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न होत आहेत. तालुक्यातील अडुळसे गाव आणि परिसरातील सात वाड्यांवर गुरुवारी (दि. 29) कोरोना विषयक जनजागृती करण्यात आली. या वेळी प्रभातफेरी आणि रंजक गाण्यांतून लोकांचे प्रबोधन करण्यात आले.

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही जनजागृती करण्यात आली. कोरोना संसर्ग होण्यापासून बचाव कसा करावा?, कोणती खबरदारी घ्यावी?, नागरिकांनी घ्यायची दक्षता याविषयी लोकांच्या घरासमोर जाऊन माहिती सांगण्यात आली. याबरोबरच लग्न समारंभ हे काटेकोर नियम व सूचनांचे पालन करून करण्यात यावेत, यासंबंधीदेखील माहिती देण्यात आली.

सरपंच भाऊराव कोकरे, ग्रामसेविका सुप्रिया जाधव, पोलीस पाटील अविनाश पिंपळे, ग्रामपंचायत सदस्य अंकिता पोंगडे, तुकाराम ठोंबरे, आशा कार्यकर्ती अश्विनी पोंगडे, अंगणवाडी सेविका वंदना तेलंगे व तारा कदम, मुख्याध्यापक संजय थळे यांच्यासह शिक्षक आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply