पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघर आपल्या प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी पनवेल महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील या कायम तत्पर असतात. रेजीन्सी क्रिस्ट, केसर गार्डन, जलवायू विहार सोसायटीतील शेकडो नागरिकांनी कोविड बुस्टर डोस घेतला. नेत्रा पाटील यांच्या पुढाकाराने शनिवार व रविवारी पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून मोफत कोविड बुस्टर डोस शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
जलवायू विहार या सोसायटीत ज्यांनी देशसेवा केली असे सैन्यातील तिन्ही दलातील माजी सैनिक वास्तव्यास आहेत. देश सेवेतील या माजी सैनिकांसाठीदेखील विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस अनेक माजी सैनिकांनी नेत्रा किरण पाटील यांनी आपल्याच सोसायटीत कोविड लसचा बूस्टर डोस उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले. कोविड व्हॅक्सीनेशन अमृत महोत्सवांतर्गत लस महोत्सव शिबिराचे आयोजन केल्याची माहिती नगरसेविका नेत्रा पाटील यांनी दिली दिली. खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी या शिबिर आयोजनात विशेष योगदान दिले.