पनवेल ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) विद्यालय इंग्रजी माध्यमात इन्वेस्टिचर समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी राष्ट्रीय हॅण्डबॉल खेळाडू तथा मुंबई युनिर्व्हसिटी विमेन्स हॅण्डबॉल कोच आणि एक उत्कृष्ट स्कूबा डायव्हर असलेले राजेंद्र सिंग आणि विद्यालयाची माजी विद्यार्थिनी तथा उत्कृष्ट अॅथेलिट स्नेहल पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्या शिक्षिका गायत्री सुरज यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे राजेंद्र सिंग यांनी मुलांना प्रोत्साहित करीत प्रत्येकाला आपापल्या करिअरमधील आवड जपण्याचा सल्ला दिला. कोणतेही एक धेय्य मनाशी पक्के करून त्याचा पाठलाग करत रहा, असे त्यांनी सांगितले. माजी विद्यार्थिनी व अॅथेलीट स्नेहल पाटील हिने आपल्या शाळेतील गत आठवणींना उजाळा देत मुलांना खेळामध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. इयत्ता दहावीतील विद्यार्थी धु्रव शर्मा व नेहा आगवेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास प्राथमिक मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, पूर्व प्राथमिक (इंग्रजी) पर्यवेक्षिका संध्या अय्यर, पर्यवेक्षिका नीरजा अदुरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.