Breaking News

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात ‘बिनधास्त बोल’

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी (दि. 30)  व्यवस्थापन शिक्षण विभागाने बिनधास्त बोल या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमासाठी अंतर्गत गुणवत्ता सिदधता कक्षाच्या समन्वयक प्रा. महेश्वरी झिरपे महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्दीष्ट विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व क्षमता व त्यासाठी मनात असलेली भीती दूर करणे हे होते. कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थापन शिक्षण  विभागप्रमुख प्रा.रित ठुले यांनी केले, तसेच अंकिता जांगिड, मीरा पटेल यांनी सहकार्य केले.

महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थीनीनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व दिलेल्या विषयावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रूपेंद्र गायकवाड तसेच संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष वाय. टी. देशमुख व संस्थेचे सचिव डॉ. सिदेश्वर गडदे यांनी प्राध्यापकांचे कौतुक केले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply