Breaking News

शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण

उरण : रामप्रहर वृत्त

महात्मा गांधी विद्यालय, दिघोडे येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हर घर तिरंगा ह्या अभियानांतर्गत शासनाच्या आदेशानुसार रविवारी (दि. 14) विद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. दहावीमध्ये प्रथम आलेली सुहानी श्रावण घरत व बारावीमध्ये प्रथम आलेली मानसी कृष्णा पाटील या विद्यार्थिनींना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला. या वेळी विद्यालयाचे प्राचार्य एन. एन. नाईक, ज्येष्ठ शिक्षक पिंपरे, फल्ले व इतर शिक्षक उपस्थित होते. शिवभत, सौ. प्रतिक्षा व प्रा. श्री. म्हात्रे यांनी राष्ट्रभक्तिपर गीते गायली. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात व तीन किमी अंतर शर्यतीत तनिष्का गंगाराम थळी हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. याबद्दल तिचा या वेळी सत्कार करण्यात आला.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply