पनवेल ः कोट्यवधींच्या कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी या बँकेचे अध्यक्ष, शेकाप नेते माजी आमदार विवेक पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम वाढला आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत सोमवारी (दि. 11) रोजी संपत असल्याने त्यांना तळोजा जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ईडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या वेळी विवेक पाटील यांचे वकील अशोक मुदरंगी यांनी त्यांच्या जामिनासाठी अर्ज केला. त्यावर 14 ऑक्टोबर रोजी सुनावणी होेणार आहे.
Check Also
आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे
तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …