Breaking News

भाजप नेते राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस आरोग्यदायी उपक्रमाद्वारे साजरा

आरोग्यसेविकांना छत्री, मास्क, सॅनिटायझरचे वाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांचा वाढदिवस मंगळवारी (दि. 6) आरोग्यदायी उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोनाची तिसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी हे संकट अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर राजेंद्र पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आजिवली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेविकांना छत्री, मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते केले.
या कार्यक्रमास पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, भाजप पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश लहाने, उपाध्यक्ष नारायण भोपी, निकेश म्हात्रे, नामदेव पाटील, सतिश पाटील, दिनेश पाटील, आप्पा भागित, नाना भागित, रमेश गडकरी, रवींद्र पाटील, अनंता पवार, विनायक पाटील, अशोक मुंडे, अल्पेश जाधव, अरुण पवार, भालचंद्र पाटील, मयुर पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply