Breaking News

पनवेल, उरण परिसरात शानदार ध्वजारोहण

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ऑगस्टपासून सुरू झालेल्या हर घर तिरंगा अभियानांतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेज आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मोरू नारायण मात्रे विद्यालय व टी. एन. घरत जुनियर कॉलेज ऑफ सायन्स या दोन्ही शाखांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयाच्या प्रांगणात सलग दुसर्‍या दिवशी ध्वजारोहण समारंभ झाला. मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रणिता गोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी गव्हाण विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर व समन्वय समिती सदस्य प्रमोद कोळी व रवींद्र भोईर, संस्थेच्या च्या लाईफ वर्कर ज्योत्स्ना ठाकूर, जुनिअर कॉलेजचे विभाग प्रमुख प्रा. बाबुलाल पाटोळे, दोन्ही शाखांचे शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply