Breaking News

दिघाटीत नवीन ग्रामपंचायत कार्यालय

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त

स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेंतर्गत दिघाटी येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते रविवारी (दि. 14) करण्यात आले. या कार्यक्रमास भाजप केळवणे जि. प. अध्यक्ष मंगेश वाकडीकर, दिघाटी ग्रामपंचायतीचे सरपंच अमित पाटील, उपसरपंच रोहिदास शेडगे, ग्रामसेवक योगीराज मनवर, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विद्याधर जोशी, दिघाटीचे माजी सरपंच दत्ता पाटील, केळवणे जि. प. युवा अध्यक्ष रोशन पाटील, जेष्ठ नेते चांगाजी पाटील, बळीराम ठाकूर, हिरामण ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील,  लक्ष्मण ठाकूर, भरत गावंड, राजाराम पाटील, सदस्य मनोहर पाटील, स्मिता ठाकूर, राजेश गावंड,वैशाली पाटील, हर्षदा पाटील, अक्षता म्हात्रे यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  या लोकार्पणावेळी तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी, ज्यांनी खर्‍या अर्थाने ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला आहे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली ह्या ग्रामपंचायत कार्यालय सुरू केले आहे ते सरपंच अमित पाटील आणि रोहिदास शेडगे यांचे कौतुक करून अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply