पनवेल : रामप्रहर वृत्त
सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त होणार्या आरोग्य महाशिबिरात प्रत्येक रुग्णाला योग्य आरोग्यसेवा मिळावी यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर, डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नियोजन समित्यांमधील पदाधिकार्यांनी दिली.
कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 45व्या वाढदिवसाचे औचित्य साधून येत्या रविवारी म्हणजेच 4 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित
करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सुकाणू, निमंत्रण, स्वागत, विविध रोग तपासणी, परिवहन, डॉक्टर व वैद्यकीय सहाय्यक समन्वय, औषधे वाटप, भोजन अशा विविध 24 समित्या कार्यरत झाल्या आहेत.
डॉक्टर आणि रुग्ण या महाशिबिरातील महत्त्वाचे घटक आहेत. प्रत्येक रुग्णाची वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत तपासणी होऊन त्यांना औषधोपचार मिळाला पाहिजे यासाठी योग्य समन्वय साधणार.
-डॉ. अरुणकुमार भगत, अध्यक्ष, डॉक्टर व वैद्यकीय सहाय्यक समिती