Breaking News

उरण येथे पाण्यामध्ये ध्वजारोहण आणि संचलन

आमदार महेश बालदी यांची संकल्पना

उरण : वार्ताहर
स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त उरण येथे रविवारी (दि. 14) मध्यरात्री 12 वाजल्यानंतर नौदलाचे निवृत्त मरीन कमांडोनी पाण्याखाली ध्वजसंचलन आणि ध्वजवंदन तसेच राष्ट्रगीत सादर केले. संपूर्ण कार्यक्रमाचे व्यवस्थापन उरणचे आमदार महेश बालदी मित्र मंडळ यांनी केले. उरणमधील श्रीमान बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलातील स्विमिंग पूलमध्ये आयोजित करण्यात आला होता.
या वेळी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, जेएनपीएचे चेअरमन संजय सेठी, व्हाईस चेअरमन उन्मेष वाघ, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, तालुका भाजपाध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर भाजपाध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेविका प्रियंका पाटील, शहर युवाध्यक्ष निलेश पाटील, हितेश शाह, निवृत्त मरीन कमांडो रवी कुलकर्णी, महेश बालदी मित्र मंडळ सदस्य, निवेदक नितेश पंडीत, प्रसाद मांडेलकर, मकरंद पोतदार व नागरिक आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात 18 कमांडोनी सहभाग घेतला. सुमारे अर्धा तास पाण्याखाली स्वातंत्र्याचा अमृतोत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तलावाभोवती लावण्यात आलेल्या भव्य स्क्रीनवरून हजारो नागरिकांनीही हा अनुभव घेतला.
ही अंडरवॉटर इंडिपेंडेंस सेलिब्रेशनची संकल्पना रवी कुलकर्णी यांची असून पाण्याखालील संपूर्ण मोहीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झाली. पाण्याखाली निवृत्त कमांडो रवी कुलकर्णी, नंदलाल यादव, रामदास कळसे, ब्रिजभूषण शर्मा, सज्जनसिंग, भूपेंद्र सिंग,विनोद कुमार, रामेश्वर यादव यांनी कमाल दाखवली, तर सपोर्टिंग टीममध्ये एन. सी. जगजीवन, विलास भगत,अनिल घाडगे, महेंद्रसिंग, बी. एस. रजपूत, चेतन चांदोरकर, प्रीतम पाटील, करण भोईर, वेंकटेश कोळी, अमित पाटील यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन कमांडर प्रवीण तुळपुळे यांनी केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply