Breaking News

काळरात्रीनंतरच धडा घेणार का?

रविवारी सकाळ उजाडली ती, मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आणि शिवसंग्राम पक्षप्रमुख विनायक मेटे हे त्यांच्या अपघाती निधनाची बातमी घेऊनच. काही त्यांच्या निधनाची बातमी सर्वदूर पोचली आणि सारे जण सुन्न झाले. अपघातानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील अपघाताबाबत अनेक मुद्दे पुढे आले आहेत. दरम्यान अपघाताच्या चौकशीचे आदेश तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 

विनायक मेट हे इंडिव्हर गाडी (क्रमांक एम एच-01, डिपी-6364) मधून पुणेकडून मुंबईकडे  पहाटे पाचच्या सुमारास जात होते.  पनवेलजवळ कि.मी नंबर 15/900 या ठिकाणी त्यांची गाडी आली आणि गाडीला अपघात झाला. या अपघातात मेटे हे गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा बॉडीगार्ड राम ढोबळे हा सुद्धा गंभीर जखमी झाला आहे. गाडी चालक एकनाथ कारभारी कदम हा जखमी झाला आहे. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती.  विनायक मेटे यांना पनवेलला एमजीएम रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचा  मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी गंभीर आरोप केला आहे. नक्की काय झाले हे मला माहित नाही, पण त्यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना लगेच रुग्णालयात आणले गेले नाही. त्या पुढे असेही म्हणाल्या याबाबत मी चौकशीची मागणी करणार आहे. मला अपघात कसा झाला हे कळण गरजेचे आहे.

अपघात नेमका कसा घडला आणि आम्हाला किती वेळानंतर माहिती देण्यात आली या गोष्टींची आम्हाला माहिती मिळाली पाहिजे. अँब्युलन्ससचा नंबर संगळ्यांकडे असतो. ड्रायव्हर फोन करु शकला असता, तो आम्हाला अपघाताचे नेमके लोकेशन देत नव्हता असा धक्कादायक आरोप ज्योती मेटे यांनी केला आहे. त्याने जर आम्हाला लोकेशन दिले असते तर आम्ही वैद्यकीय मदत पाठवू शकलो असतो. त्यामुळे मी चौकशीची मागणी करणार असल्याचे ज्योती मेटे म्हणाल्या.

दरम्यान, मुंबई पुणे एक्सप्रेस वर टोलचे पैसे वाढवतात  पण अपघात झाल्यावर वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. फक्त टोल वसुली, सुविधा शून्य अशी परिस्थिति झाल्याचे अनेकांच्या तक्रारी येत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडवर अपघात झाला तर त्या ठिकाणी टोलचा झोल करणार्‍यांची रुग्णवाहिका कधीच वेळेवर येत नाही मात्र खासगी रुग्णवाहिका आली तरी आधी पैसे मगच  अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णवाहिकेमध्ये घेतले जाते असे प्रकार घडत आहेत असल्याचे अनेक वेळा अपघातग्रस्तांचे नातेवाईकांचे तक्रार करतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक पोलीस ही या खासगी रुग्णवाहिकेलाच पाठिंबा देतात आणि अपघात झालेल्या नातेवाईकांना सांगता की, त्याला पैसे द्या माणूस कोणत्या टेन्शनमध्ये असतो ते ही कळत नाही. मात्र रुग्णवाहिका चालकांकडून  अजिबात सहकार्य केले जात नसल्याचे सांगितले जाते. याबाबत टोल वसूल करणार्‍या कंपनीने लक्ष देणे गरजेचे आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवर अनेक अपघात झाले, मात्र कधीच या रुग्णवाहिकाबाबत ठोस निर्णय घेतला जात नाही. नवी मुंबईतील डॉक्टर वैभव झुंजारे कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तेव्हा ही रुग्णवाहिका वेळेवर आल्या नाही. रुग्णवाहिका चालक फक्त पैसे पैसे करत असतात. पैसे तर दिलेच पाहिजे, मात्र थोडा वेळ लागतो कारण प्रवास करताना जास्त पैसे कोण सोबत ठेवत  नाहीत. नातेवाईक येईपर्यंत ही थांबत नाहीत असा अनेकांचा अनुभव आहे.  पोलिसांच्या 100 नंबरबाबत तर विचारूच नये तो कधी लागतच  नाही.

चुकून लागला तर समोरील कर्मचार्‍याला  आणि फोन करणार्‍यालाही अनेक वेळा  या रस्त्याबाबत फारशी माहिती नसते. त्यामुळे उलट-सुलट प्रश्न विचारण्यात वेळ जातो. त्यामध्ये वेळ जातो भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करताना प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. पोलीस मोबाईल लोकेशनच्या मदतीने आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढतात तसे अपघातचे ठिकाण शोधू शकतात. त्यासाठी शासनाने त्यांना आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

या सगळ्याबरोबरच रस्त्यावरून गाडी चालवणार्‍यांनी ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. रात्री उशिरा निघाल्यावर जेवल्या नंतर चालकाच्या डोळ्यावर झोप येते. कधी कधी अनेक तास गाडी चालविल्यामुळे चालकाला  रोड हिप्नोसिस होऊ शकतो. विनायक मेटे हे रात्री 11.30 नंतर बीडहून निघाल्याचे समजते. अपघात पहाटे 5.30 वाजता झाला. त्यामुळे चालकाला डुलकी लागली असण्याची ही शक्यता नाकारता येत नाही.  अशावेळी  रेल्वे सारखी हॉर्न वाजण्याची सुविधा गाडीत नसल्याने अपघात होऊन त्यात जिवीतहानी होऊ शकते. यासाठी प्रवासाला निघताना स्वत:च खबरदारी घेणे आवश्यक आहे.

रोड हिप्नोसिस म्हणजे काय?

रोड संमोहन ही एक शारीरिक स्थिती आहे, ज्याची बहुतेक चालकांना माहिती नसते. रस्त्यावर वाहन चालवतांना साधारणपणे 2.5 तासांनी रोड हिप्नोसिस सुरू होते. संमोहीत चालकाचे डोळे उघडे असतात, पण मेंदू क्रियाशील राहत नाही आणि डोळा काय पाहतो त्याचे विश्लेषण करत नाही. परिणाम रोड हिप्नोसिस घडून येतं.  तुमच्यासमोर उभ्या असलेल्या वाहनाला किंवा ट्रकला मागील बाजूस धडकून अपघात होतो.  रोड हिप्नोसिस असलेल्या ड्रायव्हरला टक्कर होईपर्यंत शेवटच्या 15 मिनिटांत काहीही आठवत नाही. तो कोणत्या वेगाने जात आहे, किंवा समोरून येणार्‍या गाडीच्या वेगाचे विश्लेषण करू शकत नाही, सहसा टक्कर 140 किमी पेक्षा जास्त वेगाने असते. रोड हिप्नोसिसपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी दर 2.5 तासांनी चालकाने थांबावे, चहा किंवा कॉफी घ्यावी, थोडी विश्रांती घ्यावी, 5-6 मिनिटे चालावे आणि आपले मन मोकळे ठेवावे. जर तुम्हाला वाहन चालवितांना शेवटच्या 15 मिनिटांतील काहीही आठवत नसेल, तर याचा अर्थ तुम्ही स्वत:ला आणि सहप्रवाशांना मृत्यूकडे नेत आहात. रोड संमोहन हे सहसा रात्रीच्या वेळी घडते.

-डॉ. श्रीकांत गुंडावार, रेडिओलॉजिस्ट, पूणे

-नितीन देशमुख, खबरबात

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply