Breaking News

राज्य सरकार बलात्कार्‍यांना पाठीशी घालतेय

भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप

कामोठ्यात महिला दिन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती

पनवेल ः वार्ताहर

ज्या मुलींना न्याय मिळत नाही, अशा मुलींना आत्महत्या करावी लागते, या गोष्टीची लाज वाटते. महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांविरोधात बलात्काराचे गुन्हे दाखल होऊनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे हे सरकार बलात्कार्‍यांना पाठीशी घालते, असा हल्लबोल भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.

भाजप कामोठे व वॅल्यू ऑफ स्माईल फाऊंडेशन आणि युवा मित्रमंडळातर्फे रविवारी (दि. 13) महिला दिनानिमित्त खेळ खेळू या पैठणीचा व हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल मैदान येथे करण्यात आले होते. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपा नेते हाजीअफरात शेख, महापालिकेच्या महापौर कविता चौतमोल, उपमहापौर सिताताई पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ड च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगर, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, पुष्पा कुत्तरवडे, कामोठे शहराध्यक्ष रविंद्र जोशी, भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा आशा भगत, कामोठे शहर सरचिटणीस स्वाती केंद्र, युवामोर्चा शहराध्यक्ष हर्षवर्धन पाटील, आयोजक युवानेते हॅप्पी सिंग, आयोजिका हरजिंदरकौर सिंग यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या.

या वेळी बोलताना चित्रा वाघ यांनी, मुली, महिला मेल्यानंतर आम्ही आंदोलन करतो, मोर्चे काढतो मेणबत्त्या लावतो; परंतु, ती जिवंत असताना तिला न्याय मिळत नाही. त्यामुळे हे सरकार आणि पोलीस यंत्रणा महिलांच्या सुरक्षेबाबत किती गंभीर आहे हे यावरून दिसून येत असल्याची खंतही वाघ यांनी व्यक्त केली. महिलांनी एकमेकींना संकटात साथ द्या, तरच खर्‍या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा होईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने हॅप्पी सिंग व त्यांची पत्नी हरजिंरकौर सिंग करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार प्रशांत ठाकूर यांनीसुद्धा, हॅप्पी सिंग यांच्या कार्याचे कौतुक करून आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेतून हे पती-पत्नी काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्पसंख्यांक नेते हाजीअराफत शेख यांनीसुद्धा या दोघांचे कौतुक करून या दोघांनी कामोठेपुरते सिमीत न राहता आपले कार्य अजून वाढवावे असे सांगितले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply