Breaking News

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्तांची समिती गठीत

सिडकोच्या ‘एमडीं’शी सोमवारी करणार चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त एकवटले असून, या संदर्भात पाठपुरावा करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती सोमवारी (दि. 10) सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची (एमडी) भेट घेऊन निवेदन देणार आहे.
सिडकोने नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पारित केला आहे. त्यामुळे भूमिपुत्रांमध्ये असंतोष पसरला आहे. या संदर्भात जासई येथे बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय नेते आणि संघटनांच्या बैठकीत एका समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये रायगड, ठाणे, पालघर, मुंबई अशा चार जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती शुक्रवारी सिडकोच्या एमडींची भेट घेऊन विमानतळाला माजी खासदार स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची आग्रही मागणी करणार होती, परंतु एमडी मुंबईला जाणार असल्याने ही भेट तूर्त स्थगित झाली. आता समिती येत्या सोमवारी भेट घेऊन चर्चा करणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply